पलिकडच्या जंगालातील
माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे
येथे विसावते
अन् अचानक हे शहर वसताना मी पाहतो.
(दूर राहिलेल्या जंगलतील झाडांची हलती पाने
मी खुडून घेतली होती मुठी म्हणून बरए!)
शहरांच्या धमन्यातील रक्ताचा मागोवा घेत
मी वाळू हरवलेल्या समुद्रात उतरतो
उन्हे सरपटत राहतात माझ्या खारट शरीरावरून
अन् मी या ओहटलेल्या समुद्रावरुन ओहटत.
माझ्यापुढे आता काही पर्याय आहेत.
पुढे जावे तर सुसाट वारा आकाशाचे तुकडे
माझ्या पाठीवर देईल
मागे तर शहराला भरती यायची वेळ झाली आहे.
पर्याय म्हणून मी शहराकडे पाठ करून
समुद्रावर हलका हलका पसरत जातो.
