तुझा सहवास
पहिल्या भेटीच्या आदल्या रात्री
गोड स्वप्न पहात होतो
दिवसभराचा थकवा असूनही
मी मात्र झोपत नव्हतो
साखर झोपेतली स्वप्न मला
सत्यात उतरवायची होती
तुला सोबतीला घेऊन
त्याची पुर्तता करायची होती
मिलनाची घटका जस-जशी जवळ येऊ लागली
तस-तशी हृदयाची धडधड वाढू लागली
तू येशील की नाही म्हणून थोडी काळजी वाटू लागली
वेळेच्या आधी माझ तिथं येणं
आणि नेमकं त्याच दिवशी तुला उशीर होणं
तू आल्यावर मन माझ प्रफुल्लित होणं
आता खरच माझ्या मनासारखं झालं
तू आलीस, मी पाहिलं
तु बोललीस, मी हसलो
भेटीत प्रतिक्षा करावी लागते
हे तेव्हा मला पटलं
प्रवासाला सुरूवात झाली
ठिकाण जवळ आलं
बोलण्याच्या नादात
नाही दोघांना कळलं
वाटेवरून चालताना
अलगदपणे तू माझा हात पकडलास
मी काही कमी नव्हतो
तो मी घट्ट पकडला
अलगदपणे विसावा घेऊन
आपण जोड्याने चालत होतो
वाटेवरच्या लोकांचं
आपल्याकडेच लक्ष होतं
एकांतात नुसतच आपण बोलत होतो
क्षणभर काही केलचं नाही
जे दोघांच्याही मनात होतं
केसांची पंखी हळूवारपणे डोळ्यावर उडत होती
तिथे माझी नजर चुकत नव्हती
ती हटविण्याच्या नादात
तुझ्या गालांना माझ्या हाताचा स्पर्ष झाला
क्षणभर तू डोळे मिटता, प्रवास माझा सुरू झाला
माझ्या हातांची जागा माझ्या ओठांनी घेतली
तुला ही तेच हवं होतं
तू ही हरकत नाही घेतली
चुंबनांच्या वर्षावाने अंग-अंग मोहरले
काही क्षणांतच दोघांचेही हृदय एकमेकांना बिलगले
ही शृखंला अशीच चालू होती
एका दाट झाडीमागे हि जोडी बसली होती
कुणाचही लक्ष नव्हतं, कुणाचाही भास नव्हता
तो फक्त आपल्या दोघांचा सहवास होता
रात्रभर पाहिलेल्या स्वप्नांचा तो एक ध्यास होता
ती भेटम तो प्रसंग, तो क्षण सारं काही हवं आहे
निमित्त तुला भेटण्याचं असलं तरी
सारं काही तू जाणून आहेस
मला त्या क्षणांची पुन्हा नव्याने अपेक्षा आहे
तो सहवास मला पुन्हा अनुभवायचा आहे
तुझ्याबरोबर एकांतात पुन्हा तो खेळ खेळायचा आहे
दोघांच्याही मनासारखं वागून
पुन्हा तो खेळ खेळायचा आहे
पुन्हा तो खेळ खेळायचा आहे
पुन्हा तो खेळ खेळयचा आहे
|