Aksharmanch

तांडा

हर्षद खंदारे

तांडा | Marathi Article

कोणत्या वाटेवरी हा चालला तांडा सये..

कोणती हुर-हुर चाले वादळी नजरेसवे..

 

सांस्कृतीकतेचाच कळप हा, कळपा-कळपाने तांडा होत जातो! कसा?

तांड्यातील प्रत्येक संस्कृतीविर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेला असतो आणि पी.एच.डी साठी तांड्यात सांस्कृतीक सहकाराची धडपड सुरू असते.

 

या तांड्यात अनेक घडामोडी होत असतात, घडामोडी घडविल्या जात असतात. त्यातही सांस्कृतीकतेचेच हित असते.

 

अज्ञानाने झपाटलेले काही विद्रोही तांड्यातून बाहेर फेकले जातात, त्यांचा निरोप समारोह तांड्यातील पी.एच.डी प्राप्त संस्कृती रक्षक मोठ्या जल्लोशात साजरा करतात. अन तांडा पुढे-पुढे चालत जातो.

 

नेमलेल्या ठीकाणाहून अनपेक्षीत प्रदक्षीणेसाठी पुढे-पुढे जाणे म्हणजे ज्या ठीकाणाहून निघालो त्याच ठीकाणी ’नविन कपडे’,’गंध’,’लाली’,’पावडर’ लावुन मध्यांतर झाल्याची घंटा संपण्यापुर्वी पोहोचने असते या शुल्लक अर्धसत्यास मान्यवर पुर्ण महत्व देत नसतात. तांड्याची वाटचाल निशंक सुरू असते.

 

पुढे.. तांड्यातील कळपांचे रंगांच्या सहाय्याने विवीध कप्पे केले जातात, प्रत्येत कप्प्यातील कळप व्यवस्थीत छोट्या-छोट्या डब्यांत बसवीले जातात. त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था त्यांच्या कप्प्यांच्या रंगाहून कर्तव्यदक्ष स्वयंसेवक सावकाश करित असतात. तांडा आता पुन्हा प्रवास सुरू करतो.

 

तांड्यातील कळपांची संख्या हळू-हळू वाढत जाते. कालांतराने "कळपाच्या एकात्मतेसाठी" या विषयावर तांड्यातील अनेक ’संस्कृतीवीर’(कार्यकर्ते) पी.एच.डी घेवुन बाहेर पडतात, नविन तांडा सुरू करतात, नविन कळप एकत्र आणतात.

 

कळपांची सांस्कृतीक एकात्मता दिवसेंदिवस कार्यक्षम होत जाते.
तांडा पुढे-पुढे चालत जातो, न थांबता अगदि नीशंक पणे.

Visit MarathiMati.net

नवीन लेखन - मराठीमाती.नेट new

मराठी कविता

नुसताच प्रवास गांडुगिरीचा

लाटाच लाटा
आणि समुद्र टिंगल करतोय
येडझव्या प्रवाशांची
तू ही रे! तू ही रे! गाण्यावर
मुले हिंदकळताहेत
लॉंचच्या तोंडाशी
वर खाली उभे आडवी
एक लाट येते
मी ओक ओक ओकतोय
रात्रीच्य भर समुद्रात
आदल्या रात्रीचं अजीर्ण संमेलन.

Marathi Matrimony