कैफियत
माझ्याच अंतर्मनाची ही सल किंवा वेदनेचा हा दाह नसून इथल्याच कित्येकाच्या अंतर्वेदनची व्यथा अन्याय, दारिद्र्य व उपासमारीची ही कविता आहे असं सांगु इच्छितो....!
माझ्या कवितेचा शब्द न् शब्द केवळ संभ्रमातला नसून इथल्या लोकशाही मूल्य मापनाची साक्ष आहे. म्हणूनच या काव्यसंग्रहाला `अंतरसाक्षी' नाव देण्याचं धाडस मी पत्करलं. हा `अंतरसाक्षी' आपल्या हाती देतांना आपणाकडून त्याचे स्वागत होईलच अशी मनस्वी अपेक्षा आहे.
पार उध्वस्त झालेल्या संस्कृतीची जपणूक झालीच पाहिजे असा अट्टाहास ...! परंतु काव्यप्रवाहातल्या शहाणपणानं आता जगणं कठीण केलंय आणि मृत्यू जवळ केलाय....! माणसातल्या अस्सल जिव्हाळ्याची वृत्ती तर नष्ट झालीच, तरीही माणसानं माणसाला ओळखलंच पाहिजे. माणसाची वृत्ती-प्रवृत्ती बदलत्या दिशेने सत्याला न्याय. खोट्यालाच शासन अन् भ्रष्टाचाऱ्याला वेसन घातल्या गेलो पाहिजे एवढी इच्छा व्यक्त करून शकतो.
`अंतरसाक्षी' साठी आदरणीय प्रा. प्रकाश कामतीकर संरांनी प्रस्तावना देवून कवितेचा प्रवाह कोणत्या दिशेचा आहे, तो आशयगर्भ मितव्ययी शब्दांत मांडला आहे. त्यांच्या ऋणातच राहणे मी पसंत करेन! सुरेंद्र वेदपाठक यांनी सुंदर अशी अक्षर जुळणी करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार! गुरुब्लॉक / ऑफसेट चे मालक प्रिय मित्र श्री. राजेश देशमुख यांनी या संग्रहाची सुबक अशी छपाई करुन दिल्या बद्दल त्यांच्या सहकार्याची नोंद माझ्या नेहमी स्मरणात राहण्यासारखी आहे. तसेच माझे जिवलग मित्र पी. टी. प्रधान यांनी काव्याला समर्पक अशी रेखाटने करून दिल्याबद्दल मी आभार
ह्या संग्रहासाठी प्रा. भगवान काळे सरांच्या योगदानबद्दल आभार.
शिवाय बऱ्याचशा साहित्यिक, कवि मित्रांनी माझ्या कवितेला वाव आणि न्याय दिला त्यांचा नामनिर्देश करणं मला जमणार नाही कारण नामनिर्देशात बहुसंख्य मित्रवर्य येतील आणि अनवधानाने काही राहूनही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ह्या विशुद्ध हेतूने नामनिर्देश टाळतो. परंतु माझ्या आयुष्यात हात देणाऱ्या सर्वांचाच मी ऋणाईत आहेच. एवढं नाही विसरू शकणार.....! फार काही सांगता सांगता एवढंच ... या कैफियतच्या निमित्ताने .!
- धोडांपंत मानवतकर.
|